संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता आहे. २० मार्चला संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा समाप्त होतोय. मात्र अनेक महत्त्वाची विधेयकं पारित करून घेण्यासाठी दोन दिवसांनी अधिवेशन लांबवण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 19, 2015, 10:22 AM IST
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता  title=

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबण्याची शक्यता आहे. २० मार्चला संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा समाप्त होतोय. मात्र अनेक महत्त्वाची विधेयकं पारित करून घेण्यासाठी दोन दिवसांनी अधिवेशन लांबवण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारनं जे अध्यादेश काढले आहेत. त्यांची मुदत ५ एप्रिलाल संपत आहे. तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा २० एप्रिलपासून सुरू होतोय.  त्यामुळं या अध्यादेशांशी संबंधित विधेयके पहिल्या टप्प्यातच पारित करून घेण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नाही. तसंच अधिवेशन सुरू असताना सरकार नव्यानं अध्यादेशही काढू शतक नाही. त्यामुळं लोकसभेत पारित करण्यात आलेली विधेयकं राज्यसभेत पारित करून घेण्याची धडपड सरकार करत आहे. 

यात सर्वात महत्त्वाच्या भूमी अधिग्रहण विधेयकाचा समावेश आहे. राज्यसभेत भाजप अल्पमतात असल्यामुळं आणि विरोधकांचा वाढता विरोध लक्षात घेता भूमी अधिग्रहण विधेयक राज्यसभेत पारित करून घेण्यासाठी सरकारची मोठी कसोटी लागणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.