जेटलींच्या अर्थसंकल्पात श्रीमंत आणि अतिश्रीमंतांना धक्का

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना व्यक्तीगत आणि कंपन्यांची आयकर मर्यादा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. पण, श्रीमंत अती-श्रीमंतांना मात्र सरचार्जच्या रुपानं अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

Updated: Feb 28, 2015, 05:03 PM IST
जेटलींच्या अर्थसंकल्पात श्रीमंत आणि अतिश्रीमंतांना धक्का title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना व्यक्तीगत आणि कंपन्यांची आयकर मर्यादा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. पण, श्रीमंत अती-श्रीमंतांना मात्र सरचार्जच्या रुपानं अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

अर्थमंत्र्यांनी आर्थिक वर्ष 2015-16 (मूल्यांकन वर्ष 2016-17) मध्ये 1 करोड रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या घटकांवर अर्थातच, व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ), कंपन्या, सहकारी संस्था आणि स्थानिक अधिकारी संस्थांवर 12 टक्के अधिभार (सरचार्ज) जागू केलाय.  

एक करोड रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्यांना 2 टक्के अधिक टॅक्स लावला जाईल. पण, वेल्थ टॅक्स संपुष्टात आणण्यात आलाय. 

1 करोड ते 10 करोडपर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्या भारतीय कंपन्यांवर 7 टक्के दरानं तर 10 करोडपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांवर 12 टक्के अधिभार (सरचार्ज) लावण्याचा निर्णय जेटलींनी जाहीर केलाय. 

परदेशी कंपन्यांनांमध्ये, 1 करोड ते 10 करोडपर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांना 2 टक्के दरानं तर 10 करोडोंपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांवर 5 टक्के दरानं अधिभार आकारला जाईल. 

याचवेळी संपत्ती कर संपूर्णपणे रद्द करण्यात आल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केलीय. 
 
प्रत्यक्ष कराद्वारे 14.49 लाख करोड रुपये सरकारी तिजोरीत जमा होतील, असा अंदाज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.