www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभेत अंतरिम बजट सादर करताना इन्कम टॅक्समध्ये कोणताच बदल केला नाही. उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली.
मोठ्या गाड्यांवरील उत्पादन शुल्क ३० टक्क्यांवरून २४ टक्क्यांवर केले आहे. मोटार सायकलींवरील उत्पादन शुल्क १० टक्क्यावरून ८ टक्के केले आहे. छोट्या गाड्यांचे उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर करण्यात आले आहे.
बांधकाम क्षेत्रात एक्साईज ड्युटीत दोन टक्के कपातीची घोषणा करण्यात आली. डायरेक्ट टॅक्स कोडवर जनतेच्या सूचनांची गरज असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.
वैशिष्ट्ये
- कर कायद्यात कोणताच बदल नाही
- छोटी कार, मोटार सायकल, एसयूव्हीचे उत्पादन शुल्कात कपात. सर्व गोष्टी स्वस्त होणार
- आर्थिक वृद्धीसाठी गुंतवणूक सामान क्षेत्राचे उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आले.
- छोट्या कारची उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आले.
- स्मॉल युटीलिटी व्हेईकल उत्पादन शुल्क ३० टक्क्यांवर २४टक्क्यांवर कमी करण्यात आली.
टॅक्स स्लॅब
- दोन लाखांपर्यंत कोणताही इन्कम टॅक्स नाही
- २ ते ५ लाखांवर - १० टक्के
- ५ ते १० लाखांवर - २० टक्के
१० लाखांवर – ३० टक्के
काय झाले स्वस्त
- मोटार सायकल (दुचाकी)
- फ्रिज
- टीव्ही
- भारतीय मोबाईल
- छोट्या वाहतूक गाड्या आणि छोट्या कार
- ग्राहकोपयोगी वस्तू
- भांडवली वस्तू
- प्रवासी वाहतूक
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.