बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर... उद्यापासून रोमिंग फ्री!

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं सोमवारपासून मोफत रोमिंग सेवा पुरविण्याची घोषणा केलीय. त्यामुळे आता यापुढे ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंगसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.

Updated: Jun 14, 2015, 07:35 PM IST
बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर... उद्यापासून रोमिंग फ्री! title=

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं सोमवारपासून मोफत रोमिंग सेवा पुरविण्याची घोषणा केलीय. त्यामुळे आता यापुढे ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंगसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.

'आता बीएसएनएल ग्राहकांना रोमिंगमध्ये वेगवेगळे मोबाईल आणि सिमकार्ड ठेवण्याची गरज भासणार नाही. इनकमिंग कॉलवर ते कितीही वेळ बोलू शकतील' असं बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलंय.

'वन नेशन वन नंबर'चं स्वप्न सत्यात उतरणार असल्याचंही ते म्हणाले. २ जूनला केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मोफत रोमिंगचे संकेत दिले होते. बीएसएनएलने ट्रायकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

श्रीवास्तव असंही म्हणालेत की 'ट्रायकडून त्यांना कोणतीही सूचना मिळाली नाही. बीएसएनएलने ही घोषणा दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या परवानगीनं केली आहे.' मार्चअखेर बीएसएनएलची ग्राहकसंख्या ७.७२ कोटी इतकी होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.