ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर

साधारणतः पालखीतून  किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?

Updated: Jan 24, 2016, 10:31 AM IST
ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर title=

अहमदाबाद : साधारणतः पालखीतून  किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?

अहमदाबादमध्ये राहणारी आएशा उपाध्यायने असाच एक निर्णय घेतलाय. ती आता लौकीक व्यास या कॅनडा स्थित मुलाशी विवाहबद्ध होणार आहे. लग्नमंडपात तिच्या बुलेटवरून एंट्री करण्याचा निर्णय तिने घेतलाय.

विशेष म्हणजे लौकीकला बाईक चालवता येत नाही. त्यांच्या वरातीतही आएशा बाईक चालवणार आहे.

२६ वर्षे वय असणारी आएशा गेली १३ वर्षे बुलेट चालवते. आजवर तिने तिच्या बुलेटवरून अनेक ठिकाणी प्रवासही केलाय. नववीत शिकताना पहिल्यांदा तिने तिच्या वडिलांची बाईक चालवली होती. तेव्हापासून ती बाईक्सच्या प्रेमात पडली.

लग्नानंतर कॅनडात अनेक मोठ्या बाईक्स मिळतील; पण इथलं तिचं पहिलं प्रेम असणारी बुलेट तिथे नसेल याची खंत तिला आहे.