दलित विद्यार्थी आत्महत्येवर मोदी बोलले

 हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलानं केलेल्या आत्महत्येनंतर मोदी सरकारवर टीका होतेय.

Updated: Jan 22, 2016, 04:58 PM IST
दलित विद्यार्थी आत्महत्येवर मोदी बोलले title=

लखनऊ :  हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलानं केलेल्या आत्महत्येनंतर मोदी सरकारवर टीका होतेय. या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलंय. भारतमातेनं आपला एक पूत्र गमावलाय, रोहितच्या कुटुंबाचं दु:ख मी समजू शकतो असं मोदी म्हणालेत. तसंच आमचं सरकार दलित, उपेक्षित आणि गरिबांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे, असं पंतप्रधान म्हणालेत. 

 लखनऊमधल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलंय.

विरोधकांकडून माझ्यावर वारंवार टीका होते, आणि मला वादात ओढलं जातं, पण मी गरिबांसाठी काम करतच राहीन, असं मोदी म्हणालेत. व्यवस्थेमध्ये बदल होत असल्यानं काही जण या व्यवस्थेमधून बाहेर पडतायत, म्हणूनच माझ्यावर टीका होत असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे.