मराठी पाट्यांची तोडफोड, कन्नडीगांचा धुडगूस

बेळगावात कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन घेतलं जातय. याच्याविरोधात महाराष्ट्र एकिकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलयं.

Updated: Dec 5, 2012, 03:58 PM IST

www.24taas.com, बेळगाव
बेळगावात कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन घेतलं जातय. याच्याविरोधात महाराष्ट्र एकिकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलयं. बेळगावातल्या लेले ग्राऊंडवर हा महामेळावा होतोय. या महामेळावा यशस्वी करण्यासाठी एकिकरण समितीच्या कार्यकर्त्य़ांनी कंबर कसलीये.
बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य घटक आहे हे दाखवण्यासाठी कर्नाटक सरकारनं चारशे कोटी रुपये खर्चून विधानसौंध बांधलं आहे. या सौधांत कर्नाटक सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन होतय. कानडी दडपशाहीला उत्तर देण्यासाठी महामेळावा भरवण्यात आलाय. तर दुसरीकडं कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आगळीक केलीये. येल्लूर शहरातला मराठी नामफलकाची तोडफोड केलीये.
मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड करण्यात आलीये. त्यामुळ येल्लूर मध्ये तणावाचं वातावरण झालय. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनानं खबरदारी म्हणून तात्पुरता नामफलक या ठिकाणी बसवलाय.