'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'

'टाटा सन्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांना आपली चूक आता लक्षात आलीय. 'नॅनो' बाजाराच्या स्पर्धेत उतरवताना टाटा समूहानं  विक्री आणि मार्केटींगमध्ये अनेक चुका केल्याचं त्यांनी म्हटलंय.

Updated: Jul 16, 2015, 03:18 PM IST
'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक' title=

मुंबई : 'टाटा सन्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांना आपली चूक आता लक्षात आलीय. 'नॅनो' बाजाराच्या स्पर्धेत उतरवताना टाटा समूहानं  विक्री आणि मार्केटींगमध्ये अनेक चुका केल्याचं त्यांनी म्हटलंय.

'नॅनो' ही आपली बजेट कार बाजारात उतरवताना आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना रतन टाटा यांनी व्यक्त केली होती. सामान्य माणसालाही परवडेल अशी कार निर्माण केल्याचा अभिमान त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.

'परवडणारी' कार असा प्रचार न करता या गाडीचा 'स्वस्त' कार असा प्रचार करण्यात आला... आणि हीच आमची सर्वात मोठी चूक ठरली असं रतन टाटा यांनी म्हटलंय. या प्रचाराचा नकारात्मक परिणाम झाला... एका स्वस्त गाडीचा मालक म्हणवून घेणारं लोकांना आवडणारं नव्हतं... त्यामुळेच, या गाडीच्या विक्रीवरही परिणाम झाला. 

एका मॅनेजमेंट संस्थोच्या दीक्षांत कार्यक्रमात पोहचलेल्या रतन टाटांनी 'लोकांच्या बजेटमध्ये बसावी अशी कार बनवण्यात आली होती. पण असं झालं नाही. डीलरशीपद्वारे ही कार देशभरात आम्हाला पोहचवायची होती, पण आम्ही यात अनेक चुका केल्या'  असं म्हटलंय. 

पण, या गाडीचं उद्घाटन मात्र आमच्या अपेक्षापेक्षा खूपच चांगलं झालं होतं, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.