देशात आजही येथे एकाच मुलीला करावे लागते अनेक पुरुषांशी लग्न

भारत हा पुरुषप्रधान देश आहे. पुरुषाला पुरुपोत्तम म्हणून संबोधले जाते. तर पत्नीला आपला एकच धर्म असतो, अशी काहीही भावना आहे. तिने आपल्या पतीशीच संबंध ठेवायचे. मात्र, देशात आज असे एक ठिकाण आहे की, पत्नीवर केवळ पतीचा हक्क नसतो तर तिच्या दिरांचाही असतो. येथे राहणाऱ्या महिला आपल्या पतीच्या भावांशी संबंध ठेवावे लागतात. जसे पतीसोबत ठेवावे लागतात तसेच.

Updated: Jul 7, 2016, 04:49 PM IST
देशात आजही येथे एकाच मुलीला करावे लागते अनेक पुरुषांशी लग्न title=

भोपाळ : भारत हा पुरुषप्रधान देश आहे. पुरुषाला पुरुपोत्तम म्हणून संबोधले जाते. तर पत्नीला आपला एकच धर्म असतो, अशी काहीही भावना आहे. तिने आपल्या पतीशीच संबंध ठेवायचे. मात्र, देशात आज असे एक ठिकाण आहे की, पत्नीवर केवळ पतीचा हक्क नसतो तर तिच्या दिरांचाही असतो. येथे राहणाऱ्या महिला आपल्या पतीच्या भावांशी संबंध ठेवावे लागतात. जसे पतीसोबत ठेवावे लागतात तसेच.

हे कोणी आपल्या मर्जीने आणि खुशीने करत नाही. तर एक मजबुरी आहे. या ठिकाणी जात आणि धर्माच्या नावाखाली मुलींना कमी लेखले जाते. गावातील लोकांनी हा नियम बनविला आहे. गावात एका घरात मुलांची संख्या एकापेक्षा अधिक असेल त्यांनी एकाच मुलीशी लग्न करायचे.

ही प्रथा आहे मध्यप्रदेश आणि राजस्तानच्या सीमेवरील मुरैना गावाची. येथे एक वधू एकाच कुटुंबातील भावांशी लग्न करते. लग्नानंतर ती आज एकाबरोबर तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याबरोबर राहते. तिला प्रत्येकाशी पतीप्रमाणे संबंध ठेवावे लागते. या प्रथेमुळे या गावात सर्व घरात एकच सून असते. मात्र, पतींची संख्या एकापेक्षा अधिक आहे. जर एखाद्या कुटुंबातील एकाच मुलाने मुलीशी लग्न केले तरीही त्या नववधूवर त्याच्या भावांचा हक्क असतो.

सराय छोलामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, आमच्या समाजात मुलींना कमी लेखले जाते. एका अहवालाच्या माहितीनुसार गावात निवडण्यात आलेल्या घरात एकाच मुलीचा विवाह एकाच पुरुषाशी झालाय. तिचा पती एकच आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी मुलींची जी लग्न झालेत त्यांचे एकापेक्षा जास्त पती आहेत. काहींचे तर आठ पती आहेत.