३० सेकंदात रेल्वे बुकिंगच्या सोप्या-उपयोगी टिप्स

रेल्वेचं तिकीट काढायचं आणि ते पण ऑनलाईन... किती कठीण झालंय ना आज.. राजधानीसोबत अन्य महत्त्वाच्या गाड्यांच बुकिंग अगदी एक ते दोन मिनिटांत संपतं आणि त्यानंतर तिकीट वेटिंगमध्ये बूक होतं. नवीन सर्व्हर बसविल्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पूर्वीच्या तुलनेत आता जास्त वेगाने तिकीट बुकिंग होतंय.

Updated: Jun 10, 2015, 08:47 PM IST
३० सेकंदात रेल्वे बुकिंगच्या सोप्या-उपयोगी टिप्स title=

नवी दिल्ली : रेल्वेचं तिकीट काढायचं आणि ते पण ऑनलाईन... किती कठीण झालंय ना आज.. राजधानीसोबत अन्य महत्त्वाच्या गाड्यांच बुकिंग अगदी एक ते दोन मिनिटांत संपतं आणि त्यानंतर तिकीट वेटिंगमध्ये बूक होतं. नवीन सर्व्हर बसविल्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पूर्वीच्या तुलनेत आता जास्त वेगाने तिकीट बुकिंग होतंय.

आजकाल जास्त तिकीट बुकिंग हे ऑनलाईन होतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या मते हा सगळा खेळ ३० सेकंदांचा आहे. यानंतर तिकीट मिळण्याची शक्यता कमी होते. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला ३० सेकंदात तिकीट काढायचं असेल तर काय करावं लागेल.

रेल्वेचं बुकिंग करण्यासाठी आपल्याकडे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगीन असणं गरजेचं आहे. तिकीट बुकिंग करण्यापूर्वी आपले ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र), बॅंक खाते क्रमांक, इंटरनेट बॅंकिंग आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड क्रमांक, ऑनलाईन बॅंक पासवर्ड इत्यादी सर्व गोष्टी एका जागी (नोटपॅड किंवा वर्ड फाईल) सेव्ह करून ठेवल्यास आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. असं केल्यामुळे आपलं तिकीट वेटिंगमध्ये जाण्याची शक्यता कमी होते.

रेल्वेचं तिकीट तात्काळ बुकिंग सकाळी १० वाजता सुरू होतं त्यापूर्वी आपल्याकडे नियोजित तिकीटाची सर्व माहिती लिहून ठेवलेली असल्याची खात्री करून घ्या. आपल्याला ज्या गाडीचे तिकीट पाहिजे असेल त्याची सर्व माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ही सर्व माहिती योग्य असल्याची एकदा खात्री करून घ्या.

जेव्हा तिकीट बुकिंग सुरू होईल, तेव्हा सर्व माहिती एका ठिकाणी  लिहून ठेवलेली असल्यामुळे आपला वेळ वाचेल आणि ३० सेकंदात आपले तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. आपण वेगाने तिकीट बूक करू शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.