दिल्ली विधानसभा सरकार स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न

दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे. त्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

Updated: Jul 17, 2014, 10:19 AM IST
दिल्ली विधानसभा सरकार स्थापनेसाठी भाजपचे प्रयत्न title=

नवी दिल्ली : दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे. त्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

भाजपने आपली रणनीती सुरु केली आहे. त्यासाठी काँग्रेस बंडखोर आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी फिल्डींग लावल्याचे बोलले जात आहे. बंडखोरांना फोडण्याची भाजपने तशी रणनीती आखण्यात आली आहे. 

परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परत येताच दिल्लीत सरकार स्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलेय. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी ज्येष्ठ नेते जगदीश मुखी यांचे नाव चर्चेत आले आहे. 

दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सरकार स्थापनेबाबत बुधवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. सरकार स्थापनेसाठी आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसने मात्र भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी  भाजप आमचे आमदार फोडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप केलाय.

तर दुसरीकडे काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपचा प्रतत्न आहे. तसचे आपचे 10 आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेतील बहुमताचे संख्याबळ कमी होऊन 29 आमदार असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.