'बिसलरी'चं बाटलीबंद पाणी लॅब टेस्टमध्ये फेल!

नुकताच, सुरक्षितता चाचणीत 'मॅगी'ला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता... त्यानंतर आता बिसलरीचं बाटलीबंद पाणीही या चाचणीत फेल झालंय. 

Updated: Nov 12, 2015, 05:45 PM IST
'बिसलरी'चं बाटलीबंद पाणी लॅब टेस्टमध्ये फेल! title=

नवी दिल्ली : नुकताच, सुरक्षितता चाचणीत 'मॅगी'ला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता... त्यानंतर आता बिसलरीचं बाटलीबंद पाणीही या चाचणीत फेल झालंय. 

उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये बिसलरीचं बाटलीबंद पाणी खाद्य चाचणी परिक्षेत फेल ठरलंय. खाद्य विभागानं १८ सप्टेंबर रोजी मिर्झापूरच्या एका दुकानावर छापा मारून बिसलरीचं सॅम्पल जप्त केलं होतं. हे सॅम्पल लखनऊच्या लॅब मध्ये सुरक्षिततेसंबंधी परिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. 

या परिक्षणात बाटलीबंद पाणी अयशस्वी ठरलंय. बिसलरीनं पिण्याच्या पाण्याचे आवश्यक निकष पूर्ण न केल्याचं या चाचणीत समोर आलं. यानंतर, आता खाद्य विभाग बिसलरी कंपनीला नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. कंपनीला पुढच्या ३० दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावं लागले. 
 
'बिसलरी'शिवाय बाजारात एक्वाफिना, साका, बेली यांसारखे अनेक मिनरल वॉटर सप्लाय करण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या आहे. 
 
यापूर्वी, 'मॅगी'वरही असे आरोप झाले होते. यानंतर मॅगीला बाजारातून आपले प्रोडक्टस मागे घ्यावे लागले होते. दरम्यान, मॅगीनं पुन्हा एकदा बाजारात पदार्पण केलंय.   
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.