बिपिन रावत होणार नवे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Updated: Dec 17, 2016, 10:03 PM IST
बिपिन रावत होणार नवे लष्करप्रमुख  title=

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एअर चीफ मार्शल बी.एस. धनाओ हे  भारताचे नवे वायूदलप्रमुख असणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग आणि वायूसेनाप्रमुख अरुप राहा हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत. यानंतर बिपिन रावत आणि धनाओ त्यांचा पदभार स्वीकारतील.

लष्करप्रमुख आणि हवाईप्रमुखांबरोबरच आयबी आणि रॉ प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव जैन हे आयबीचे तर अनिल धसमाना रॉचे प्रमुख असतील.