मोदींच्या गुजरातमध्ये... मतदान अनिवार्य!

तुम्ही जर गुजरातचे मतदार असाल आणि मतदानाच्या दिवशी तुम्ही प्रत्यक्षात जाऊन मतदान केलं नाही, तर यापुढे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण, तसा कायदाच गुजरातमध्ये संमत करण्यात आलाय. 

Updated: Apr 13, 2015, 03:39 PM IST
मोदींच्या गुजरातमध्ये... मतदान अनिवार्य! title=

अहमदाबाद : तुम्ही जर गुजरातचे मतदार असाल आणि मतदानाच्या दिवशी तुम्ही प्रत्यक्षात जाऊन मतदान केलं नाही, तर यापुढे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण, तसा कायदाच गुजरातमध्ये संमत करण्यात आलाय. 

'अनिवार्य मतदाना'चा कायदा लागू करणारं गुजरात हे भारतातील पहिलंच राज्य ठरलंय. गुजरातच्या राज्यपालांनीही या नव्या आणि वेगळ्याच कायद्यावर शिक्कामोर्तब केलंय. 

यामुळे, पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेला मतदान करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

यासाठी, गुजरात सरकारद्वारे नियुक्त केलेल्या समितीनं मतदान अनिवार्य करण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. गुजरातचे माजी निवडणूक आयुक्त आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी के सी कपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलीय. या समितीनं सूचवलेल्या सूचना अंमलात येतील.

नागरिक आपली मतं या समितीकडे फॅक्स किंवा ईमेलच्या साहाय्याने आपली पोहचवू शकतात. यापूर्वीही, ऑनलाईन मतदानाचा अधिकार देत गुजरात सरकारनं एक नवी सुरुवात केली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.