खासदार रविंद्र गायकवाडांवर कारवाई करणारे हे आहेत ते एअर इंडियाचे अधिकारी

एअर इंडियाने आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातली होती. पण नागरिक उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्या हस्तक्षेपानंतर एअर इंडियाने शुक्रवारी गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली.

Updated: Apr 8, 2017, 09:29 PM IST
खासदार रविंद्र गायकवाडांवर कारवाई करणारे हे आहेत ते एअर इंडियाचे अधिकारी title=

मुंबई : एअर इंडियाने आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातली होती. पण नागरिक उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्या हस्तक्षेपानंतर एअर इंडियाने शुक्रवारी गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली.

शिवसेना के सांसद रवींद गायकवाड़ को 'जमीं पर उतारने' के पीछे है एयर इंडिया का यह अधिकारी

शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांन एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर रविंद्र गायकवाड यांना धडा शिकवणाऱ्या त्या अधिकाऱ्याचं नाव आहे अश्विनी लोहाणी. जे एअर इंडियाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. 

लोहाणी यांच्याबद्दल बोललं जातं की ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असतात. सोबतच अशा प्रकारच्या घटनांशी निपटण्यासाठी त्यांना नागरिक उड्डान मंत्री अशोक गजपती राजू यांचं देखील समर्थन मिळालं होतं.

लोहाणी यांनी या आधीही अनेकांना धडा शिकवला आहे. लोहाणी यांना 'टर्न अराउंड मॅन'च्या नावाने देखील ओळखलं जातं. एक इमानदार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना भ्रष्टाचार जराही आवडत नाही. ते आणि त्यांचं कुटुंब हे नेहमी तिकीट विकत घेऊनच विमान प्रवास करतात. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी लोहाणी यांना कॉरपोरेट क्रेडिट कार्ड मिळालं आहे पण त्यांनी ते कधीच वापरलं नाही. एमपीटीडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर असतांना देखील त्यांनी कधी त्यांच्या होटलमध्ये मोफत जेवण नाही केलं.

लिम्का आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव 

लोहाणी भारतीय रेल्वे सर्विस ऑफ मॅकेनिकल इंजिनियर्सच्या 1980 बॅचचे अधिकारी आहेत. लोहाणी यांच्याकडे मेकेनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रानिक्स अँड टेलीकम्यूनिकेशंसच्या ४ पदव्या आहेत. यामुळे त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. शिवाय 1998 मध्ये 'फेयरी क्वीन एक्सप्रेस' चालवल्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील नोंद आहे.