'बीफ' वाहतूक करणाऱ्या दोघांना खायला लावलं शेण

गायीचे शेण मिसळलेला पदार्थ जबरदस्तीने खायला भाग पाडल्याची एक घटना हरयाणामध्ये समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  बीफची वाहतूक करत असल्याच्या संशयातून गो रक्षक दलाच्या सदस्यांनी दोघांना शेण मिसळलेला पदार्थ खाण्यास भाग पाडल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jun 28, 2016, 05:41 PM IST
'बीफ' वाहतूक करणाऱ्या दोघांना खायला लावलं शेण title=

नवी दिल्ली : गायीचे शेण मिसळलेला पदार्थ जबरदस्तीने खायला भाग पाडल्याची एक घटना हरयाणामध्ये समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  बीफची वाहतूक करत असल्याच्या संशयातून गो रक्षक दलाच्या सदस्यांनी दोघांना शेण मिसळलेला पदार्थ खाण्यास भाग पाडल्याचं सांगण्यात येत आहे.

रिझवान आणि मुख्तियार या दोघांना गुरगाव गो रक्षक दलाचा अध्यक्ष धर्मेंद यादवने १० जून रोजी 'पंचगाव्य' खायला लावल्याची कबुली दिली. दोघांना आपल्या पद्धतीने शिक्षा दिल्यानंतर गो रक्षक दलाच्या सदस्यांनी त्यांना फरीदाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना शुद्ध करण्यासाठी आणि धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांना जबरदस्तीने पंचगाव्य खायला लावले असे धर्मेंद यादवने सांगितले. 
 
गो रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना बीफची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर कुंडली-मानेसर पालवल एक्सप्रेस वे वर कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली. 
 
आम्ही सात कि.मी.पर्यंत गाडीचा पाठलाग करुन बंडारपूर सीमेजवळ गाडी थांबवली. त्यांच्या गाडीत ७०० किलो बीफ होते असे यादवने सांगितले. मेवाटहून दिल्लीला हे बीफ नेण्यात येत होते.