नवी दिल्ली : १ जानेवारीपासून बँकांची सेवा ही अधिक महाग होणार आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांनी सेवा शुल्क दरात वाढ केली आहे. एसबीआयने सर्वात मोठ्या प्रमाणात सेवा दरात वाढ केली आहे.
स्टेट बँकेने नोव्हेंबर २०१४ मध्येही दर वाढवले होते. बँक लॉकर, एटीएम अशा अनेक सुविधांचं बँक आपल्याकडून प्रोसेसिंग फी घेतं. येत्या १ तारखेपासून वाढलेले सेवा शुल्क ग्राहकांकडून घेण्यात येतील.
शहरी भागात १५ ते ३५ टक्के, ग्रामीण भागात ५ ते ९ टक्के सेवा शुल्क दरात वाढ करण्यात आली आहे.
लॉकर सेवा शुल्क ७५६-९७९ वरून ८००-११००
डेबिट कार्ड सेवा शुल्क १०० वरून ११४.५० रुपये
प्लेटिनम कार्ड सेवा शुल्क ३०६ वरून ३४२.३० रुपये