मुलींवरील बलात्काराला मोबाईल जबाबदार- बंगळुरू आमदार

कर्नाटक विधानसभेच्या एका समितीनं एक मागणी करत नव्याच वादाला तोंड फोडलंय. समितीच्या मते बलात्कार थांबविण्यासाठी शाळा आणि कॉलेजसमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी लावायला हवी. 

PTI | Updated: Jul 13, 2014, 08:31 AM IST
मुलींवरील बलात्काराला मोबाईल जबाबदार- बंगळुरू आमदार  title=
प्रातिनिधिक फोटो

बंगळुरू: कर्नाटक विधानसभेच्या एका समितीनं एक मागणी करत नव्याच वादाला तोंड फोडलंय. समितीच्या मते बलात्कार थांबविण्यासाठी शाळा आणि कॉलेजसमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी लावायला हवी. 

महिला व बाल कल्याण संबंधी आमदारांच्या समितीनं म्हटलं, “कर्नाटक सरकारनं शिक्षण विभागाला आदेश द्यायला हवे की ते शाळा आणि कॉलेजमध्ये मोबाईल फोन आणण्यावर बंदी लावेल.” शकुंतला शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील 23 सदस्यांच्या समितीचा रिपोर्ट शुक्रवारी कर्नाटकाच्या दोन्ही सभागृहात सादर केला गेला. रिपोर्टत्या ‘महिलांवरील बलात्कार: बेपत्ता प्रकरण’ या मथळ्याखाली ही शिफारस करण्यात आली. 

रिपोर्टमध्ये देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांचा उल्लेख केला गेलाय. यात दिल्लीतील 2012च्या गँगरेपचा आणि उत्तर प्रदेशात नुकताच झालेल्या दोन बहिणींवरील गँगरेप आणि हत्येच्या घटनांचा उल्लेख केला गेलाय. यात मांडण्यात आलंय की, या घटनांमुळे संपूर्ण भारतीयांची मान शर्मेनं झुकलीय.  

शेट्टी यांनी आपल्या वादग्रस्त निष्कर्ष आणि शिफारशींचा बचाव करत म्हटलं, “आम्ही चर्चेत पाहिलं की शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसोबत होणाऱ्या अपहरण आणि बलात्काराच्यामागे मोबाईल आहे”. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.