डोंबिवलीतील खोट्या गुन्हाची रेल्वेमंत्र्यांकडून दखल, अहवाल मागविला

उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पुनम महाजन यांनी आज रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन डोंबिवलीतील खोट्या गुन्ह्याची नोंद करुन दोन महाविद्यालयीन तरुणींचा मारहाण केल्याचा प्रकार कानावर घातला. याची तात्काळ दखल घेत रेल्वेमंत्री गौडा यांनी चौकशी आदेश जारी केली. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अहवाल सादर करा, अशा सूचना संबंधिताना केल्या आहेत.

Updated: Jul 12, 2014, 11:01 PM IST
डोंबिवलीतील खोट्या गुन्हाची रेल्वेमंत्र्यांकडून दखल, अहवाल मागविला title=

नवी दिल्ली : उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पुनम महाजन यांनी आज रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन डोंबिवलीतील खोट्या गुन्ह्याची नोंद करुन दोन महाविद्यालयीन तरुणींचा मारहाण केल्याचा प्रकार कानावर घातला. याची तात्काळ दखल घेत रेल्वेमंत्री गौडा यांनी चौकशी आदेश जारी केली. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अहवाल सादर करा, अशा सूचना संबंधिताना केल्या आहेत.

दरम्यान, त्याआधी रेल्वे पोलीस आुयक्तांनी या खोट्या गुन्ह्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. सह.आयुक्त रेडेकर चौकशी अहवाल सादर करणार आहेत.

रेल्वे पोलिसांकडूनच महिला प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ केला. याचा धक्कादायक प्रकार समोर आला. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दोन कॉलेज तरुणींबाबत खोटा गुन्हा नोंदवला. आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी उल्हासनगरला निघालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींना चोरीचा आळ घेऊन तुरुंगात डांबून ठेवल्या़ची तक्रार दोन तरुणींनी केली. त्यानंतर मीडियाने हे प्रकरण उचलून धरले.त्यानंतर याची दखल खासदार पुनम महाजन यांनी घेतली. त्यांनी थेट दिल्ली गाठून रेल्वे मंत्री गौडा यांच्या कानावर हा प्रकार घातला.

एम कॉमचं शिक्षण घेत असलेल्या या तरुणींवर पाकिटमारी, मोबाईल चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल करण्या़त आलेत. एवढंच नाही तर त्यांना संपूर्ण रात्र तुरुंगात डांबून अमानुष मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप त्या दोन तरुणींनी केलाय. डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्याचसमोर त्यांच्याविषयी अश्लील बोलत होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही वरिष्ठांकडून या प्रकाराची दखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त होत होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.