पंतप्रधान, राजीनामा द्या- बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं. आणि 2 ऑक्टोबरपासून नव्या जोमानं आंदोलन करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 2, 2012, 08:42 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं. आणि 2 ऑक्टोबरपासून नव्या जोमानं आंदोलन करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
2014 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक तसंच वर्षाअखेर गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करत असल्याची घोषणा बाबा रामदेवांनी केली.

दरम्यान, योगगुरु रामदेव बाबा आता कोळसा खाण भ्रष्टाचाराच्या वादात पडले आहेत. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधानांवर हल्लाबोल केलाय. कोळसा खाणीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून काँग्रेसचे अनेक नेते यात सामील असल्याचं त्यांनी म्हटलंय. रामदेव बाबांनी याप्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.