www.24taas.com, मुंबई
कोळसा घोटाळा प्रकरणात खासदार विजय दर्डा आणि शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे हात काळे झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याचप्रमाणे सुबोधकांत सहाय यांचाही कोळसा खाण घोटाळ्यात हात असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
कोळसा घाटाळ्याप्रकरणी भाजपचे खासदार किरीट सोमैय्या यांनी आता आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वांल यांच्याी वरदहस्तानं दर्डा कुटुंबियांच्या जवाहरलाला दर्डा एनर्जी लिमिटेड आणि केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांच्या कंपनीला कोळसा खाणींचं वाटप झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. या प्रकरणात २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दर्डा यांना नऊ खाणींचे वाटप झाले. दोन्हीव नेत्यांाची भागीदारी होती. खाण वाटप झालेल्यापैकी बऱ्याच कंपन्या जयस्वाल यांच्याच नावाच्या होत्या, असंही यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. जयस्वााल यांच्याच नावाने बनावट कंपन्या सुरु करण्या त आल्याम. त्याीतून हवालाच्याल माध्यंमातून पैसा लावण्या्त आला आणि बनावट कंपन्यांच्या नावावर हा सगळा व्यवहार पार पडला, असा दावा सोमैय्या यांनी केलाय.
दर्डा कुटुंबीयांची यवतमाळमधली कंपनी जवाहरलाल दर्डा एनर्जी लिमिटेड आणि सुबोधकांत सहाय यांच्या कंपनीला संयुक्तपणे कोळसा खाणींचे वाटप झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तब्ब ल 25 हजार कोटींच्यां खाणींचे वाटप करण्याझत आले. बनावट कंपन्यांाच्याय नावावर खाणवाटप झाले. बऱ्याच कंपन्या जयस्वा्ल यांच्या च नावाच्याआ होत्यान, असा आरोप करुन सोमैय्या यांनी केलाय. याप्रकरणाची जबाबदारी स्विकारून जयस्वालल आणि सुबोधकांत सहाय यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी यावेळी केलीय.