जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

Updated: Jun 28, 2015, 11:36 PM IST
जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस title=

नवी दिल्ली : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

मॉन्सूनचा पाऊस जुलैमध्ये सरासरीपेक्षा आठ आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा दहा टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. पण, जुलै आणि ऑगस्टमध्ये जून महिन्याप्रमाणे चांगल्या पावसाची अपेक्षा नाही. त्याबरोबरच मॉन्सूनपूर्व पाऊस काही भागांमध्ये चांगला झाल्याने एवढी अडचण येणार नाही, असं आयएमडीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी म्हटलंय.

आयएमडीने यावर्षी सरासरीपेक्षा कमी म्हणजे 88 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविलेला आहे. मात्र, जूनमध्ये सरासरीपेक्षा 28 टक्के जास्त पाऊस झालेला आहे.

आयएमडीच्या अगदी उलटा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तविला आहे. स्कायमेटने जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 104 टक्के आणि ऑगस्टमध्ये सरासरीएवढा म्हणजे 99 टक्के पाऊस पडेल असे म्हटले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.