विधानसभा निवडणूक निकाल 2017 : पाच राज्यांचा निकाल एकाच क्लिकवर आकडेवारीसह

  आज जाहीर झालेल्या निकालांत भाजपने बाजी मारली तरी तीन राज्यांत काँग्रेसने नंबर वन पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2017, 12:14 AM IST
विधानसभा निवडणूक निकाल 2017 : पाच राज्यांचा निकाल एकाच क्लिकवर आकडेवारीसह title=

नवी दिल्ली : देशात पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यात. आज जाहीर झालेल्या निकालांत भाजपने बाजी मारली तरी तीन राज्यांत काँग्रेसने नंबर वन पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे. उत्तर प्रदेशात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. त्यामुळे समाजवादी पाटी, काँग्रेस, बसप यांचा सुपडा साफ झाला आहे. मात्र, अन्य तीन राज्यांत काँग्रेसने चांगले यश मिळवलेय.

पंजाबमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता हाती मिळवली. तर गोव्यात 17 जागा मिळवत सत्तेच्या दिशेने पाऊल टाकलेय. सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यश मिळवले आहे. तर मणिपूरमध्ये पुन्हा बाजी मारली आहे. मात्र, नागा पीपल्स फ्रंटवरच भवितव्य अवलंबून आहे.

तर भाजपने उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये या दोन ठिकाणी भाजपने सत्ता काबीज केली आहे. तर गोव्यात आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला जम बसवता आलेला नाही. पंजाबात 21 जागांवर समाधान मानवे लागले आहे. तर गोव्यात आप आणि शिवसेनेला खाते खोलता आलेले नाही. मात्र, राष्ट्रवादीने गोव्यात एक जागा मिळत आपला यश मिळवलेय.

निकाल पाहा 5 राज्यांचा

- गोवा

- मणिपूर

उत्तराखंड -

पंजाब - 

उत्तर प्रदेश -