परदेशी महिलेचा पतीसमोरच विनयभंग; तक्रार दाखल

 मूळ ऑस्ट्रेलियन तरुणीचा तिच्या पतीसमोर विनयभंग करून तिला बेदम मारण्यात आलंय. ही घटना राजस्थानमधल्या पुष्करमध्ये घडली. 

Updated: Jun 24, 2014, 02:56 PM IST
परदेशी महिलेचा पतीसमोरच विनयभंग; तक्रार दाखल title=

नवी दिल्ली : मूळ ऑस्ट्रेलियन तरुणीचा तिच्या पतीसमोर विनयभंग करून तिला बेदम मारण्यात आलंय. ही घटना राजस्थानमधल्या पुष्करमध्ये घडली. 

ही महिला मूळची ऑस्ट्रेलियन आहे. या महिलेनं भगवान पुरा भागातील एका भारतीय तरुणाशी विवाह केलाय. ही तरुणी आपल्य पतीसोबत बाहेर पडली असताना दारुच्या नशेत धूत काही तरुणांनी तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तिचे रस्त्यातच कपडे फाडण्यात आले. इतकंच नाही तर या तरुणीला बेदम मारहाणही करण्यात आली. त्यानंतर या तरुणीच्या गळ्यातील चैन आणि पैसेही जबरदस्तीनं काढून घेतले गेले.   

हे जोडपं तक्रार नोंदविण्यासाठी जेव्हा पोलिसांत गेलं तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरच अविश्वास दाखवत प्रकरणाची तक्रार नोंदविण्यासाठी नकार दिला, असा आरोपही या जोडप्यानं केलाय. मीडियानं हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यात आलीय.   

भगवान पुरा गावातील या विदेशी जोडप्यासोबत घडलेल्या या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. परंतु, गुन्हेगार मात्र अद्यापही हाती लागलेले नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.