... या बछड्याची कामगिरी ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल!

गुजरातच्या गिर प्राणी उद्यानात तुमचं मन हेलावून टाकू शकेल, अशी एक घटना घडलीय. इथल्या एका सिंहाच्या छोट्या पिल्लाच्या कामगिरीनं इथल्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. 

Updated: Aug 14, 2014, 02:02 PM IST
... या बछड्याची कामगिरी ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल! title=

गिर : गुजरातच्या गिर प्राणी उद्यानात तुमचं मन हेलावून टाकू शकेल, अशी एक घटना घडलीय. इथल्या एका सिंहाच्या छोट्या पिल्लाच्या कामगिरीनं इथल्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. 

या बछड्यानं आपल्या मृत आईच्या शरीरापर्यंत वन कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्याचं काम केलंय. जेव्हापर्यंत कर्मचाऱ्यांनी या बछड्याच्या आईचं मृत शरीर जागेवरून हलवलं नाही तेव्हापर्यंत या बछडा तिथंच बसून होता. एका सिंहाच्या पिल्लाचा हा व्यवहार पाहून सगळेच उपस्थित भावूक झाले होते. 

सहसा, छोटी बछडी आपल्या आईविना कुठेही जात नाहीत. अडीच ते तीन वर्षांची होईपर्यंत ते आपल्या आईवरच निर्भर असतात. त्यामुळे, जेव्हा एका गार्डनं या बछड्याला एका झाडीत लपून बसलेलं पाहिलं तेव्हा त्याला थोडं आश्चर्य वाटलं. तो या बछड्याजवळ गेला... तेव्हा हा बछडा पुढे-पुढे चालू लागला.

त्यानं या गार्डला तिथपर्यंत नेलं, जिथं त्याची आई मृत अवस्थेत निपचित पडलेली होती. गार्ड आपल्या इतर सहकाऱ्यांना याबद्दल सूचित करण्यासाठी गेला... परतल्यानंतर त्यानं पाहिलं की हा छोटा बछडा तिथंच आईशेजारी बसून त्यांची येण्याची वाट पाहत होता. हा बछडा केवळ 15 महिन्यांचा आहे.

गिरच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या बछड्याचा हा व्यवहार इतरांपेक्षा खूप वेगळा होता... त्यांनी आत्तापर्यंत असं कधीही अनुभवलं नव्हतं.

गिरमध्ये 2010 च्या गणनेनुसार 411 सिंह आहेत. ज्या सिंहिणीचा मृत्यू झालाय तिचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलंय. त्यावरून, इतर जनावरांशी लढताना तिचा मृत्यू झाला असावा, असं दिसतंय. जंगली म्हशींशी या वाघिणीचा सामना झाला असावा आणि त्यात ती गंभीर जखमी झाली असावी, असा अंदाज बांधला जातोय. या सिंहिणीचं नाव रुपा असं होतं ती 11 वर्षांची होती. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.