'एअर इंडिया'मध्येही दिसणार तरुण हवाई सुंदरी!

‘एअर इंडिया’च्या सुविधांत सुधार व्हावा आणि ही कंपनी इतर स्पर्धक कंपन्यांच्या मागे राहू नये यासाठी नागरिक उड्डान मंत्री अशोक गजपती राजू यांनी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्यात... यामध्ये, फ्लाईटस् मध्ये कमी वयाच्या एअरहोस्टेस असाव्यात, अशा सूचना राजू यांनी दिल्यात. 

Updated: Aug 14, 2014, 12:58 PM IST
'एअर इंडिया'मध्येही दिसणार तरुण हवाई सुंदरी! title=

नवी दिल्ली : ‘एअर इंडिया’च्या सुविधांत सुधार व्हावा आणि ही कंपनी इतर स्पर्धक कंपन्यांच्या मागे राहू नये यासाठी नागरिक उड्डान मंत्री अशोक गजपती राजू यांनी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्यात... यामध्ये, फ्लाईटस् मध्ये कमी वयाच्या एअरहोस्टेस असाव्यात, अशा सूचना राजू यांनी दिल्यात. 

एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, गणपती राजू यांनी 35 वर्षापर्यंतच्याच एअरहोस्टेसचा ‘केबिन क्रू’मध्ये समावेश असावा, अशा सूचना दिल्यात. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एअरहोस्टेसना ग्राऊंड ऑपरेशनच्या कामासाठी शिफ्ट करण्यात यावं, अशीदेखील सूचना त्यांनी केलीय. 

राजू एअर इंडियाच्या सद्य परिस्थितीमुळे नाखूश आहेत. त्यामुळेच त्यांनी या नव्या गाईडलाईन्स जारी केल्यात. राजू यांनी जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, फ्लाईटसला उड्डानासाठी झालेल्या उशिरामुळे प्रवाशांना होणारी असुविधा खपवून घेतली जाणार नाही. यासाठी, एअर इंडियाला उशिरा निघणाऱ्या फ्लाईटसचा मासिक रिपोर्ट उड्डान मंत्रालयाकडे जमा करावा लागणार आहे. 

तसंच, राजू यांनी एअर इंडियाच्या स्टाफला हटवून उड्डान मंत्रालयाशी संबंधित दुसऱ्या विभागांत, एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया आणि सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीमध्ये ट्रान्सफर करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे, एअर इंडियाच्या लवकरच जवळपास 7000 कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर लेटर मिळू शकतं. 

तसंच, नव्या गाईडलाईन्समध्ये केबिन क्रूला प्रवाशांसोबत चांगली वागणूक करण्याचं आणि कोणत्याही परिस्थितीत विमान उड्डाणासाठी उशीर न करण्याच्या सूचना पायलटला देण्यात आलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.