उल्लेखनीय : २३ वर्षांच्या कारकिर्दीत ४६ वेळा बदल्या

 हरियाणाचे वादग्रस्त आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली झालीय. ही त्यांची ४६ वी बदली ठरलीय. 

Updated: Apr 3, 2015, 02:34 PM IST
उल्लेखनीय : २३ वर्षांच्या कारकिर्दीत ४६ वेळा बदल्या title=

नवी दिल्ली :  हरियाणाचे वादग्रस्त आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली झालीय. ही त्यांची ४६ वी बदली ठरलीय. 

आपल्या सेवेच्या २३ वर्षांच्या कारकीर्दीत खेमका यांची तब्बल ४६ वेळा बदली झालीय, हे उल्लेखनीय... याचाच अर्थ वर्षातून सरासरी दोन वेळा त्यांची बदली झालीय. 

बदलीच्या नियमानुसार एखाद्या सनदी अधिकाऱ्याची दोन वर्षांची सेवा पूर्ण झाल्याशिवाय त्याची बदली करण्यात येत नाही. मात्र, खेमका हे त्याला अपवाद ठरलेत.

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या भूखंड गैरव्यवहारांचं प्रकरण त्यांनी बाहेर काढलं. त्यामुळं काँग्रेस सरकारच्या राजवटीत त्यांच्यावर वारंवार बदलीची कारवाई करण्यात आली. 

आता भाजप सरकार आल्यानं खेमकांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपच्या राजवटीतही खेमकांसारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला न्याय मिळत नाहीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.