जोधपूर : गुरूकूलमधील अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाच्या आरोपात गुरूवारी आसाराम बापू सेशन कोर्टात दाखल झाले. कोर्टाच्या बाहेर आल्यावर मीडियाशी बोलताना सलमानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी सलमानला जामीन मिळाल्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले, की जामीनाचे काय आहे आहे, आता पाहा सलमानला जेल पण झाली आणि बेल पण झाली. मी वृद्ध झालो आहे पण मला बेल मिळत नाही. मलाही बेल मिळेल. येवढे बोलून ते पोलिसांच्या वाहनात बसून जेल रवाना झालेत.
आसाराम यांना सप्टेंबर २०१३ पासून जोधपूर येथील जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जमानतसाठी आसाराम यांनी सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दरवाजा खटखटविला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.