www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा जनलोकपालच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय.
`जनलोकपाल विधेयक मंजूर झालं नाही तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ` असं केजरीवाल म्हणालेत. काँग्रेसनं साथ दिली नाही तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केजरीवालांनी हे विधान केलंय.
`मी मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो नाही. दुसऱ्यांदा निवडणुका झाल्या तर आम आदमी पार्टी बहुमतानं निवडणुन येईल` असंही त्यांनी म्हटलंय.
जनलोकपाल मसुद्यातील काही मुद्यांना काँग्रेस आणि भाजपचा विरोध आहे. आता काँग्रेस काय भूमिका घेतं हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.