आजपासून देशातील २२,५०० एटीएम कार्यरत होतील - जेटली

केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळपासून देशभरातील २२,५०० एटीएम अपग्रेड होणार असल्याची माहिती दिलीय. 

Updated: Nov 17, 2016, 04:33 PM IST
आजपासून देशातील २२,५०० एटीएम कार्यरत होतील - जेटली title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळपासून देशभरातील २२,५०० एटीएम अपग्रेड होणार असल्याची माहिती दिलीय. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील अनेक एटीएम अजूनही बंद असल्यानं नागरिकांना अजूनही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. मोजक्या सुरू असलेल्या एटीएमसमोर रांगाच रांगा दिसत आहेत.

पाचशे आणि हजाराच्या नोटेवरच्या बंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी आशा जेटली यांनी व्यक्त केलीय.