www.24taas.com, नवी दिल्ली
विवाहित असूनही एका महिला पोलिसासोबत लग्न करुन फसविणाऱ्या लष्कराच्या एका जवानला अटक करण्यास आली आहे. लग्न करून महिलेचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप जवानावर ठेवण्यात आला आहे.
अनिल असे या जवानाचे नाव आहे. पिडीत महिला पोलीस पश्चिम दिल्लीतील एका पोलिस ठाण्यात नोकरीला आहे. सध्या ती सुभाष प्लेस येथील पोलीस कॉलनीमध्ये राहते. पिडीतेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2011 मध्ये तिची अनिलसोबत रोहतक येथून दिल्लीला येताना ट्रेनमध्ये ओळख झाली. ट्रेनमध्येनच तिची प्रकृती खराब झाली होती. त्यावेळी अनिलने तिची मदत केली होती. त्यायनंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नासपूर्वीच त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. लवकरच लग्न करु, असे सांगून तो तिचे लैंगिक शोषण करत होता. आपण अविवाहित असल्याचे त्याने सांगितले होते.
अखेर दोघांनी गाझियाबाद येथील एका शिव मंदिरात लग्न केले. त्याननंतर एक दिवस भांडण झाल्यामुळे तो घरातून निघून गेला. अनेक दिवस तो परतलाच नाही. अखेर तिने दिल्लीत कँटला जाऊन त्यांची माहिती काढली. त्यावेळी जे सत्य समोर आले, त्याने तिला मोठा धक्काच बसला. त्यायने स्वतःबद्दल सर्वकाही खोटे सांगितले होते. तो विवाहीत होता. त्याला एक मुलगीदेखील आहे.
पिडीतेने त्याचे घर शोधून काढले. त्याच्या वडिलांना सर्व सांगितले. ती घरी आल्या्मुळे अनिल भडकला. थेट तिचे घर गाठून तिला मारण्याचा प्रयत्न केला. कसाबसा जीव वाचवून ती पोलिस ठाण्या्त पोहोचली. अनिलविरुद्ध तिने तक्रार दाखल केली. सुमारे महिनाभर त्याने तिला धमकाविले. त्याने हल्ला् केल्यानंतर अखेर तिने तक्रार केली. त्यानंतर अनिलला अटक करण्यात आली.