48 तासात संपत्ती जाहीर करा, मोदींचा भाजप खासदारांना इशारा

मोदी सरकारला लवकरच सहा महिने पूर्ण होणार आहेत, त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी भाजपच्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. 

Updated: Nov 26, 2014, 05:20 PM IST
48 तासात संपत्ती जाहीर करा, मोदींचा भाजप खासदारांना इशारा title=

नवी दिल्ली : मोदी सरकारला लवकरच सहा महिने पूर्ण होणार आहेत, त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी भाजपच्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. 

ज्या खासदारांनी अजून संपत्ती जाहीर केलेली नाही, त्यांनी त्वरीत आपल्या संपत्तीचा तपशील देण्याचे आदेश नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ही माहिती खासदारांना सार्वजनिक करण्यासाठी मोदींनी 48 तासांची मुदत दिली आहे. ही माहिती एका वेबसाईटवर सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे.

पीएम मोदी यांनी या निर्णय अशावेळी घेतला आहे, जेव्हा काळ्या पैशांच्या मुद्यावर सरकारला विरोधकांनी घेरलं आहे. या शिवाय चौफेर मोदी सरकारवर काळे पैस परत न आणण्याचे आरोप होत आहेत.

भाजपने लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशांचा मुद्दा उचलला होता, भाजपने दावा केला होता की, सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांच्या आत काळा पैसा भारतात परत आणू. मात्र याच मुद्याने आता मोदी सरकारची झोप उडवली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.