www.24taas.com, राळेगणसिद्धी
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींच्या अटकेबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही सरकारवर टीका केलीय. कोळसा घोटाळा करणारे देशाला लूटत आहेत. त्यामुळं तेच खरे देशद्रोही असल्याची घणाघाती टीका अण्णांनी केली आहे.
“जे खरे देशद्रोही आहेत, ते बाहेर मोकळे फिरत आहेत. सरकारचा अभ्यास कमी असून सरकारला ट्रोनिंगची गरज आहे. व्यंगचित्र काढणारे जनजागृतीचे कार्य करतात त्यामुळं त्यांना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे.” असं अण्णांनी सांगितलंय.
खुद्द असीम त्रिवेदीनेही आज पत्रकार परिषदेत मी भारतीय घटनेचा सन्मान करतो असं मान्य केलं आहे. “मी भारतीय घटनेचा सन्मान करतो. पण आपल्या नेत्यांकडून संसदेचा होणारा अपमान मला व्यंगचित्रातून दाखवायचा होता. स्वातंत्र्याची गळचेपी करणारा कायदा मी मानत नाही,” असं असीम त्रिवेदी म्हणाले.