मुंबई : आप नेते कुमार विश्वास यांच्यावर भाजपने गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असतांना दुसरीकडे, भाजपच्या जाहिरातीमध्ये अण्णा हजारेंच्या फोटोला पुष्पहार घातल्यानंतर अण्णा समर्थक संतापले आहेत.
आता या प्रकरणी अण्णा हजारेंनी स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाच्यावतीनं भाजपला नोटीस देण्यात येणार आहे.
तसेच अण्णा हजारे यांची बदनामी करणाऱ्या भाजपविरोधात रीतसर गुन्हा दाखल करावा, असं निवेदन अण्णा समर्थकांनी पोलिसांना दिलं आहे. भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त शाम असवा यांनी यांसदर्भात माहिती दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपनं एक जाहीरात प्रकाशित केली होती. ज्यामध्ये एक कार्टून छापलं होतं. अरविंद केजरीवाल यांचा विवाह काँग्रेस सोबत झाला, असं त्यात दाखवण्यात आलं, आणि भिंतीवर अण्णा हजारेंचा फोटोला पुष्पहार घालण्यात आला अशी जाहिरात भाजपने छापली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.