आंध्र सरकारकडून भिकाऱ्यांना ५ हजार रूपये

एका यात्रेपासून भिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आंध्र सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे, मात्र सरकारवरचं याचं बुमरँग होतंय, कारण जे भिकारी नाहीत ते सुद्धा पाच हजार रूपये घेण्यासाठी सरसावले आहेत.

Updated: Jul 22, 2015, 05:15 PM IST
आंध्र सरकारकडून भिकाऱ्यांना ५ हजार रूपये title=

राजमुंदरी : एका यात्रेपासून भिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आंध्र सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे, मात्र सरकारवरचं याचं बुमरँग होतंय, कारण जे भिकारी नाहीत ते सुद्धा पाच हजार रूपये घेण्यासाठी सरसावले आहेत.

आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या गोदावरी पुष्कारालू यात्रे दरम्यान भिकाऱयांना दूर ठेवण्यासाठी, सरकार भिकाऱयांना सरकार पाच हजार रुपये देणार आहे.

यात्रेपासून दूर राहणाऱ्या भिकाऱयांना पाच हजार रुपयांशिवाय अन्न मिळणार आहे. यासाठी २५ जुलै पर्यंत त्यांना दूर राहावे लागणार आहे. मात्र, या घोषणेमुळे प्रशासनापुढे मोठी समस्या उभी राहिली आहे. जे भिकारी नाही ते सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.

‘सरकारी योजनांचा लाभ घेणारेही या योजनेत सहभागी झाले आहेत. भिकाऱयांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून २०० जणांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. भाविकांना त्रास होऊ नये यासाठी योजना आखण्यात आली आहे,' असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.