मुकेश अंबानीच्या मुलाने घटवले ७० किलो वजन

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने काही महिन्यांतच तब्बल ७० किलो वजन घटवलेय. 

BGR | Updated: Mar 20, 2016, 11:51 AM IST
मुकेश अंबानीच्या मुलाने घटवले ७० किलो वजन title=

अहमदाबाद : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने काही महिन्यांतच तब्बल ७० किलो वजन घटवलेय. 

शनिवारी अनंत अंबानी सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला असता त्याला पाहिल्यानंतरच सर्वच आश्चर्यचकित झाले. अमेरिकन ट्रेनरच्या मदतीने त्याने आपले वजन कमी केल्याचे सांगण्यात येतय. 

काही महिन्यांपूर्वी त्याचे वजन दुप्पट होते. सोमनाथ मंदिरात त्याला पाहून लोकांना आश्चर्यच वाटले. हाच तो अनंत अंबानी की काय असा त्यांना प्रश्न पडला.