मुंबई : जगातील सर्वात गोपनीय पद्धतीने काम करणारी पनामा कंपनी मोसाक फोसेंकाचे कागदपत्र लिक झाले आहेत, यात १२ राष्ट्राध्यक्षांसह, ६० पेक्षा जास्त मोठ्या हस्तींच्या अकाऊंटची माहिती समोर आली आहे.
यात महानायक अमिताभ बच्चन यांचं देखील नाव आलं आहे, यावर अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी मीडियात जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे, इंडियन एक्स्प्रेसने ज्या कंपनीच्या नावाचा उल्लेख केला आहे. मी यातील कोणत्याही कंपनीला ओळखत नाही.
या कंपन्या आहेत, सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड, लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेजरर शिपिंग लिमिटेड, आणि ट्रंप शिपिंग लिमिटेड.
अमिताभ पुढे म्हणतात, मी यातील कोणत्याही कंपनीच्या निर्देशक राहिलेलो नाही, असं वाटतंय की माझ्या नावाचा दुरूपयोग केला जात आहे. मी सर्व काही टॅक्स भरले आहेत. यात परदेशात केलेला खर्च देखील सामिल आहे. कदाचित इंडियन एक्स्प्रेसनेही असा कोणताही संदेश दिलेला नाही की, मी काहीही चुकीचं केलेलं आहे.