राहुल यांनी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केलीय का?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केलीय. राहुल यांनी जेएनयूमधल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. 

Updated: Feb 15, 2016, 01:15 PM IST
राहुल यांनी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केलीय का? title=

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केलीय. राहुल यांनी जेएनयूमधल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. 

याप्रकरणावरुन अमित शाह यांनी ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार टीका केलीय. राहुल गांधींनी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केलीय का, असा सवालही अमित शाह यांनी विचारलाय. 

तसंच राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही अमित शाह यांनी केलीय. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.