चेन्नई : तामिळऩाडूच्या मुख्यमंत्री जयललितांच्या यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह चेन्नईला आले.
जयललिता चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये गेल्या 20 दिवसांपासून उपचार घेत आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
तरीही प्रकृती बद्दल संपूर्ण राज्यात कमालीचा संभ्रम आहे. आपल्या नेत्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा अर्चना सुरू केलीय.
चेन्नईमध्ये आज अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदार, खासदारांनी यज्ञयाग आणि पूजा सुरू केलीय. अशा पूजा अर्चनांनी आपली आवडती अम्मा लवकरच बरी होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.