नोटांवर आंबेडकर,विवेकानंदाची छायाचित्रे?

 लवकरच तुम्हाला नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 31, 2015, 12:23 PM IST
नोटांवर आंबेडकर,विवेकानंदाची छायाचित्रे? title=

नवी दिल्ली :  लवकरच तुम्हाला नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थ, नियोजन तज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी यासंबंधित प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलाय. यात नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे असावीत अशी सूचना त्यांनी केलीय. डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंती सोहळ्यात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समितीत ते सदस्य होते. 

कोणत्याही देशातील करन्सीवर त्या देशांतील दिग्गज नेत्यांची छायाचित्रे असतात. १९९६नंतर भारतात सर्व नोटांवर महात्मा गांधींचे फोटो आहेत. यात बदल करणे हे नक्कीच मोठे पाऊल असेल, असे जाधव यावेळी म्हणाले. 

समितीच्या पहिल्या बैठकीत मी पंतप्रधान मोदींना ही संकल्पना सुचवलीये. अमेरिका तसेच युकेमध्ये तेथील मोठ्या नेत्यांची छायाचित्रे असतात. भारतातही हे होऊ शकते. आपणही डॉ. आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे छापू शकतो, असे जाधव यांनी सांगितले. नुकतीच सरकारने डॉ. आंबेडकरांचे छायाचित्रे असलेली नाणी जारी केली आहेत.  

१९९६पूर्वी भारताच्या नोटांवर महात्मा गांधीव्यतिरिक्त अशोक स्तंभाचा फोटोही छापण्यात येत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून केवळ गांधींजीचे छायाचित्रे असलेल्या नोटा छापल्या जात आहेत.