...ही आहे भारताची पहिली महिला 'आर्यभट्ट'!

Updated: Dec 31, 2015, 11:56 AM IST
...ही आहे भारताची पहिली महिला 'आर्यभट्ट'! title=


महिला 'आर्यभट्ट'

नवी दिल्ली : भारताला एक नवा 'आर्यभट्ट' मिळालाय... नव्हे 'मिळालीय'... या महिला आर्यभट्टाचं नाव आहे नीना गुप्ता... 

नीनाला सध्या सगळे 'मॅथ्स जीनियस' म्हणून ओळखतात. कारण, तिनं गणिताच्या विश्वात केलेलं काम हे केवळ 'अद्भूत' आहे. 

कोलकातामध्ये राहणाऱ्या नीना गुप्तानं गेल्या वर्षी इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी (INSA)चं प्रतिष्ठित अॅवॉर्ड  पटकावलं होतं. तिला हे अॅवॉर्ड एक तरुण सायन्टिस्ट म्हणून देण्यात आलंय. नीनाला  गणिताचा एक प्रश्न सोडवण्यात यश मिळालंय जे गेल्या ७० वर्षांपासून कुणाला सोडवायला जमलं नव्हतं. 

या गणितीय प्रश्नाला 'झरिस्की कॅन्सलेशन कॉजेक्चर' (Zariski Cancellation Conjecture) म्हटलं जातं.

अधिक वाचा - ज्या कोर्टात वडील चहा विकतात, त्याच कोर्टात मुलगी बनली 'न्यायाधीश'!
 
INSच्या अॅवॉर्डसोबतच नीनाला २०१४ चा रामानुजन प्राईज आणि टाटा इन्स्टिट्यूच ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) च्या एल्युमनाई असोसिएशनकडून २०१३ चा सरस्वती कॉवसिक अॅवॉर्डही देण्यात आलंय. 

आता, मात्र नीना 'कम्युटेटिव्ह अल्जेब्रा' या विषयाचा अभ्यास करतेय. TISS मध्ये ती सध्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही काम करते. याशिवाय कोलकाताच्या इंडिय स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटमध्येही ती व्हिजिटिंग सायटिस्ट आहे.. 

आपल्या या यशाचं सारं श्रेय नीना, सामाजिक दबावाला झुगारुन शिक्षणाची संधी देणाऱ्या पित्याला आणि आपल्याला नेहमीच साथ देणाऱ्या पतीला देते.