समाजवादी पार्टीचा घोषणांचा पाऊस, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-लॅपटॉप

समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश निवडणूकांसाठी आपला जाहीरनामा घोषीत केलाय.

Updated: Jan 22, 2017, 11:08 PM IST
समाजवादी पार्टीचा घोषणांचा पाऊस, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-लॅपटॉप title=

लखनऊ : समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश निवडणूकांसाठी आपला जाहीरनामा घोषीत केलाय. मुलायमसिंह यांच्या गैरहजेरीत अखिलेश यादव यानी पार्टीचे घोषणापत्र जाहीर केले.

प्राथमिक शिक्षण घेणा-या मुलांना एक किलो तुप आणि कुपोषित मुलाना एक किलो दुध पावडरचे डब्बे देण्यात येतील असं या घोषणापत्रामध्ये सांगण्यात आलं आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि स्मार्ट फोन, नोकरदार महिलांना हॉस्टेल, बसभा़ड्यात पन्नास टक्के सवलत, गरिब महिलांना प्रेशर कुकर आणि अत्यंत गरिब असणाऱ्यांना फुकटात गहू आणि तांदूळ, एक कोटी नागरिकांना महिन्याला एक हजार रुपये पेन्शन अशा अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहे.