नवी दिल्ली : प्रदूषणाच्या विळख्यात भारतीय घुसमटत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. वायू प्रदुषणामुळे तर नागरिकांना श्वास घेणंही कठीण बनलंय.
दर मिनिटाला सरासरी दोन भारतीयांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय क्षेत्रातील द लॅन्सेट या नियतकालिकाच्या अहवालातून समोर आली आहे.
एक दशलक्षापेक्षा अधिक भारतीय नागरिक दूषित हवेमुळे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच, अनेक भारतीय शहरं प्रदूषित झाल्यानं ती जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.