एअर इंडियावर प्रवाशांच्या उड्या, वेबसाईट क्रॅश

एअर इंडियाने 100 रूपयात विमान प्रवासाची योजना जाहीर केली आणि विमानात स्वतात सफर करू इच्छिणाऱ्यांनी एअर इंडियाच्या वेबसाईटवर उड्या टाकल्यायत.

Updated: Aug 27, 2014, 09:13 PM IST
एअर इंडियावर प्रवाशांच्या उड्या, वेबसाईट क्रॅश title=

नवी दिल्ली : एअर इंडियाने 100 रूपयात विमान प्रवासाची योजना जाहीर केली आणि विमानात स्वतात सफर करू इच्छिणाऱ्यांनी एअर इंडियाच्या वेबसाईटवर उड्या टाकल्यायत.

मात्र एअर इंडियाच्या वेबसाईटवर ट्रॅफिक वाढल्याने, एअर इंडियाची वेबसाईट अखेर क्रॅश झालीय, सर्व्हिस नॉट एव्हलेबल असा मेसेज येऊ लागलाय. एअर इंडियाच्या इतर तिकीट बुकिंग सेवेच्या लिंकही 'सिस्टम बिझी' असल्याचे मेसेज देऊ लागल्या आहेत.

एअर इंडियाची शंभर रूपयात प्रवासाची योजना
विमानानं जाण्याचं तुमचं स्वप्न अत्यंत कमी खर्चात साकार होणं आता शक्य आहे. एअर इंडियाचं तिकीट आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत, तब्बल महिन्याभराच्या प्रवासासाठी 100 रुपयांमध्ये एअर तिकीट काढता येणार आहे. अर्थात, त्यासाठी आजपासून 31 तारखेपर्यंत बुकिंग करणं आवश्यक असेल.

एअर इंडियाच्या वेबसाईटवरूनट तिकीट बुक करणंही बंधनकारक असेल. 2007 साली झालेल्या एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स विलिनीकरणानिमित्त दिवस एअर इंडिया डे साजरा केला जाणार आहे.त्यासाठी प्रवाशांना अवघ्या 100 रुपयांमध्ये हवाई सफर घडवण्याची ही योजना कंपनीनं राबवली आहे.

यानिमित्त एका खास कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येणार असून त्यात चांगली कामगिरी बजावणा-या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात येईल. चार वर्षांपासून समाजवादी पक्षापासून दूर गेलेले अमरसिंह पुन्हा मुलायमसिंह यांच्या जवळ येऊ पाहत आहेत. मागील आठवड्यात ते मुलायमसिंह यांना निवासस्थानी भेटले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.