जंगलात सापडलेले 'ते' अवशेष शीनाचेच

रायगड परिसरातील जंगलात सापडलेले मृतदेहाचे अवशेष शीना बोराचेच असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. 

Updated: Nov 19, 2015, 04:14 PM IST
जंगलात सापडलेले 'ते' अवशेष शीनाचेच  title=

नवी दिल्ली : रायगड परिसरातील जंगलात सापडलेले मृतदेहाचे अवशेष शीना बोराचेच असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. 

एम्सच्या टीमने जंगलात सापडलेल्या अवशेषांची चाचणी केली होती. या चाचणीत हे अवशेष शीना बोराचे असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हा अहवाल सीबीआयच्या टीमला देण्यात आला आहे. आता सीबीआय या हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय यांच्याविरोधात काही दिवसांत चार्जशीट दाखल होण्याची शक्यता आहे.

गुन्हे दंडसंहितेनुसार, कोणत्याही प्रकरणात ९० दिवसांच्या आत आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करणे गरजेचे असते. अथवा त्यांना जामीन मिळू शकतो. सध्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील तीनही आरोपी कोठडीत आहेत. या आरोपीं विरोधात दक्षिण मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात येईल. 

२०१२मध्ये २४ वर्षीय शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर रायगडजवळच्या जंगलात तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, कारमध्ये शीनाची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.