अलाहाबाद : हिंदूंनी किती अपत्य जन्माला घालावीत यावर सध्या चर्चा होतांना दिसतेय, प्रत्येक दिवशी नवनवीन वक्तव्य केली जात आहेत.
यात आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे. कारण प्रत्येक हिंदु कुटुंबाने दहा अपत्यांना जन्म देण्याचा कानमंत्र बद्रिकाश्रमाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरसस्वी यांनी दिला आहे. यापूर्वी साक्षी महाराज आणि साध्वी प्राची यांनी हिंदू कुटुंबाने चार अपत्यांना जन्म द्यावा, असे म्हटले होते.
अलाहाबाद येथे सुरू असलेल्या 'धर्म संगम' मेळाव्यात शंकराचार्य सरस्वती यांनी हिंदू नागरिकांना हा सल्ला दिला आहे. शंकराचार्य सरस्वती म्हणाले, 'हिंदू एकजूट झाल्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले. हिंदूना बहुसंख्यांक होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने दहा मुलांना जन्म दिला पाहिजे.'
घर वापसीच्या मुद्द्यावर बोलताना शंकराचार्य सरस्वती म्हणाले, की हिंदू धर्मातूनच शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा जन्म झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला पुन्हा आपल्या मुळ धर्मात परतण्याचा अधिकार आहे. घर वापसीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणले नाही पाहिजेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.