मंगळनंतर इस्रोची नजर बुध आणि शुक्रावर

यशस्वी 'मार्स आर्बिटर मिशन'नंतर आता इस्रो बृहस्पती आणि शुक्र या दोन ग्रहावर जाण्याच्या मिशनवर आहे.

Updated: Jan 5, 2017, 11:22 AM IST
मंगळनंतर इस्रोची नजर बुध आणि शुक्रावर title=

नवी दिल्ली : यशस्वी 'मार्स आर्बिटर मिशन'नंतर आता इस्रो बुध आणि शुक्र या दोन ग्रहावर जाण्याच्या मिशनवर आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे (इस्रो)  सहाय्यक निर्देशक एम नागेश्वर राव यांनी म्हटलं की, आम्ही अन्य ग्रहांवर आता जाण्याचा प्रयत्न करत आहोत. जेथे आम्ही अजून माहिती मिळवू शकू. या अभियानांतर्गत आम्ही अभ्यास करणार आहोत की आपल्याला कसे उपग्रह बनवावे लागतील आणि कशा प्रकारच्या रॉकेटची गरज असेल. 

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या एका सत्रात बोलत असतांना त्यांनी म्हटलं की, परीक्षण सुरु आहे आणि योजना बनवली जात आहे. याला काही वर्षा लागू शकतात. त्यांनी म्हटलं की, शुक्रावर उपग्रह पाठवण्याची संधी 19 महिन्यातून एकदा येते.