नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये.
दोन हजार रुपयांच्या नोटेवरुन महात्मा गांधीजींचे चित्रच गायब असल्याचे प्रकरण समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन शेतकऱ्यांना बँकाकडूनच अशा नोटा मिळाल्यात ज्यावर गांधीजींचे चित्रच नाहीये. जेव्हा शेतकऱ्यांनी या नोटा पाहिल्या तेव्हा ते हैराणच झाले.
या तक्रारीनंतर नोटा परत घेण्यात आल्या. मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येकजण आपल्याजवळील दोन हजार रुपयांच्या नोटा तपासू लागले. दरम्यान या नोटा नकली तर नाही असा संशय व्यक्त केला जातोय.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील काडूखेडली गावातील आहे. या गावातील गुरमीत सिंह यांनी मंगळवारी एसबीआयच्या शाखेतून ८ हजार रुपये काढले. बँकेतून त्यांना २०००च्या ४ नोटा मिळाल्या. मोठी रांग असल्याने ते पैसे घेऊन रांगेतून बाहेर पडले. मात्र जेव्हा त्यांनी नोटा पाहिल्या तेव्हा ते चांगलेच हैराण झाले. कारण या नोटांवर गांधीजींचे चित्रच नव्हते. त्यांनी तातडीने ही गोष्ट बँकेच्या मॅनेजरला दाखवली. तपासानंतर या नोटा परत घेण्यात आल्या. अशीच घटना लक्ष्मण सिंह मीणा यांच्यासोबत घडली. त्यांच्याकडूनही या नोटा परत घेण्यात आल्या.
ब्रांच मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या शोपूर येथील शाखेत ४९ लाख रुपये मागवण्यात आले होते. या नोटांचे वितरणही करण्यात आले. मात्र ज्या नोटांवर गांधीजींचे चित्र नाही अशा नोटा पुन्हा जमा कऱण्यात आल्यात.
Sheopur (Madhya Pradesh): Farmer receives Rs 2000 notes from SBI Bank without Mahatma Gandhi's image pic.twitter.com/To8yiFIFxq
— ANI (@ANI_news) January 5, 2017