आता भारतात ट्रिपर डेकर बस!

आतापर्यंत तुम्ही डबल डेकर बस, ट्रेन, विमान आणि जहाज पाहिलं असेल. मात्र आता मेरठ विश्वविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी भारतासाठी ट्रिपल डेकर बसची नवी कॅन्सेप्ट घेऊन येणार आहेत. 

Updated: Jul 6, 2014, 03:55 PM IST
आता भारतात ट्रिपर डेकर बस! title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही डबल डेकर बस, ट्रेन, विमान आणि जहाज पाहिलं असेल. मात्र आता मेरठ विश्वविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी भारतासाठी ट्रिपल डेकर बसची नवी कॅन्सेप्ट घेऊन येणार आहेत. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसची उंची, लांबी आणि रुंदी साधारण लक्झरी बससारखी आहे. मात्र त्या बसचे डिझाईन असे करण्यात आलंय की, या बसचे 3 वेगवेगळे मजले असणार, तसेच त्यात प्रवाशांना आरामात बसताही येणारंय.

मेरठला राहणारे ग्राफिक डिझायनर सचिन घज आणि त्यांचे काही सहकारी संदीप चौधरी आणि प्रशांत कुमार यानी या बसचं डिझाईन तयार केलंय. सचिनचं म्हणणं आहे की, जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या प्रोजेक्टला मान्यता दिली तर कोणतीही कंपनी यासाठी मदत करायला तयार आहे. २०१६ पर्यंत अशा बसेस रस्त्यावर दिसणार आहेत. 

२४ वर्षाच्या सचिन घजने या बसच नावं ही 'घज' ठेवलं आहे.  ही बस पहिला आणि दुसरा मजला एअर कंडिशनर असेल आणि बसचा तिसरा मजला ओपन असणार आहे. बदलत्या वातावरणानुसार त्यासाठी उपाय केले जातील, म्हणजेच गरज पडल्यास त्याला छप्पर ही लावले जातील. 

सामान्य बससारखी याची उंची असेल, मात्र यात एकावेळेस १०३ प्रवाशी प्रवास करु शकतात. सचिनच्या मते ही मॅल्टीपर्पज बस आहे. जस शाळा, कॉल सेंटर, कारखाने, कंपनी किंवा लोकल आऊटडोर टूर साठी यांचा वापर करु शकतो. 
 
बसची काही खास वैशिष्ट्य
उंची - ११ फूट
रुंदी - ८ फूट 
लांबी- १२ फूट
खर्च - ४५ ते ५० लाख प्रति बस 
फ्लोर, उंची आणि प्रवासी क्षमता
तळ मजला- ३.७५ फूट, ३६ प्रवाशी
पहिला मजला- ३.७५ फूट, ४४ प्रवाशी
टॉप मजला- ३ फूट, २३ प्रवाशी
रस्त्यावरुन बसच्या मजल्याची उंची - ०.७५ फूट 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.