भोपाळ : एखाद्या खाजगी रुग्णालयात 50 टक्क्यांहून अधिक महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळलं तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.
मध्यप्रदेश सरकारनं महिलांचं स्वास्थ्य लक्षात घेता हा एक खास कायदा केलाय... जो इतर राज्यांनीही अंमलात आणण्याची गरज व्यक्त केली जातेय. खाजगी रुग्णालयात महिलांच्या आरोग्याशी होणारी हेळसांड आणि सिझेरियन प्रसुतीचा अतिवापर रोखण्यासाठी मध्यप्रदेश सरकारनं हे पाऊल उचललंय.
त्यासाठी, ज्या हॉस्पीटल्समध्ये 50 टक्क्यांहून अधिक सिझेरियन प्रसुती झाल्याचं आढळलंय त्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. खाजगी हॉस्पीटलकडून नियमित रुपात होणाऱ्या प्रसुतींविषयी सगळी माहिती मागवली जाणार आहे. यात 50 टक्क्यांहून अधिक प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळल्यास अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे.